डॉ. दक्षा पंडित आणि डॉ. मानसी पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत durga maa kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
durga maa kavita
काव्यबंध समूह
रविवारीय काव्यस्पर्धा
दि :८.१०.२०२३
विषय: नवरात्री
शक्तीरूप पूजन | durga maa kavita

नवरात्रीची झाली सुरवात
शक्तीरूप दुर्गेच्या पूजनाने
शौर्य,धैर्याच्या नऊरूपांना
पुजूया आपण भक्तीभावाने….१
नवदुर्गेचे प्रथम शक्तीरूप
शैलपुत्रीचे करूया पूजन
अरि संहार करू धैर्याने
शक्तीरूपास करू वंदन…२
महिषासुरमर्दिनी करते
राक्षसी वृत्तीचा नायनाट
शक्ती दुर्गेचे रूप घेऊनी
शोधूया मग प्रकाशवाट…३
शक्ती,संपत्ती करिता
पंचमीस देवीची उपासना
घारग्यांचा प्रसाद दावुनी
ललितादेवीची आराधना….४
महाअष्टमीला करूया
लक्ष्मी प्रतिमेस नमन
रात्री घागरी फुंकुनी
करूया देवीचे अर्चन….५
विजयादशमीला करते
चामुंडा वध महिषासुराचा
रावण-रामाच्या युध्दात
विजय झाला श्रीरामाचा….६
नवरात्रीचे आगमन होता
शक्तीरूप देवींना वंदन
शस्त्रांचे पूजन करूनी
दोषांचे होऊ दे सीमोलंघन….७
नवरात्रीत घेऊ वचन
काम,क्रोध,लोभाचे दमन
मद,मोह,मत्सराचे गमन
सुखशांतीचे होई आगमन….८
नवरात्रीला घरच्या स्त्रीच्या
भाव भावनांचे ठेवा भान
घराला उध्दारण्या स्त्रीचा
सकलांनी करावा सन्मान…०९
नवरात्री सण उत्साहाचा
स्नेह,आनंद वाटण्याचा
शौर्य,धैर्य,शक्ती वाढवुनी
माणुसकीला जपण्याचा….१०
डाँ दक्षा पंडित
सँनडियागो, अमेरिका
durga maa kavita
स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह आयोजित
स्पर्धा काव्यलतिका
दि ८/१०/२३
विषय: नवरात्री
नऊ अवतार | durga maa kavita

पहिले रूप शैलपुत्री करिते नमन माते तुजला
पाषाणासस अढळ प्रतिबद्धता दे तू आम्हाला।
दुसरे रूप ब्रह्मचारिणी करिते नमन माते तुजला
पराक्रम शूरता सामर्थ्य दे तू आम्हाला।
तिसरे रूप चंद्रघंटा करिते नमन माते तुजला
सजगता खंबीरपणा दे तू आम्हाला।
चौथे रूप कृष्मांडा करिते नमन माते तुजला
नवनिर्मितीची उर्जा दे तू आम्हाला।
पाचवे रूप स्कंदमाता करिते नमन माते तुजला
कौशल्य निरागसता दे तू आम्हाला।
सहावे रूप कात्यायनी करिते नमन माते तुजला
संरक्षण वचनबद्धता एकरूपता दे तू आम्हाला।
सातवे रूप कालरात्रि करिते नमन माते तुजला
कार्यक्षम होण्यासाठी शांत निद्रा दे तू आम्हाला।
आठवे रूप महागौरी करिते नमन माते तुजला
जीवनाचे उच्च दान प्रदान कर तू आम्हाला।
नववे रूप सिद्धिदात्री करिते नमन माते तुजला
प्राविण्य आणि मुक्ती दे तू आम्हाला ।
कर मनोकामना पूर्ण आमुची माते कर जोडुनी प्रार्थना तुजला।
नवरात्रीत नऊ रुपांची आराधना करण्याची बुध्दी दे आम्हाला !
©️®️ डॉ मानसी पाटील
मुंबई

durga maa kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह