प्रा. केशव मुगुटवार काकडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Famous poems about grandchildren विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Famous poems about grandchildren
📙📘 काव्यबंध समूह 📗📕
काव्यलतिका
दिनांक:- १४/०९/२०२३
विषय :- आजीचा छकुला
आजीचा लाडला | Famous poems about grandchildren

आजीला तिच्या प्राणाहून प्रिय तिचा लाडला
कारण तो तिच्या कुशीत मुशीत वाढला
आजी सांगे त्याला राजा रंक रामायण महाभारताच्या गोष्टी
लाडलाही करी आजीशी गुजगोष्टी
आजी फिरवे त्याला तिच्या खांद्यावरी
त्याला वाटे ती विमानवारी
आजी भरवे त्याला घासातला घास प्यारी
तो वाटे त्याला लय भारी
आजी लाडल्यावर
लाडला आजीवर प्रेम करी
कारण झोपताना तो आजीचा पदर धरी
धावफळीच्या या जमान्यात
आई वडील नोकरीत दंग
म्हणूनच लाडल्याला राहावे लागते आहे आजी संग
बदलत्या जमान्यात आई-वडिलांना होते
लाडल्याच्या आजीची आठवण
इतर वेळी मात्र केली जाते त्यांची इतरत्र पाठवण
शेवटी ….
केशवाचे मन आपुले धन
सांगतो आयका…
ऐका ‘आजीच्या लाडल्यावर’ ऐकावे आपण ध्यान देऊन…. लाडला हा लाडला असतो
तो आई-वडिलांपेक्षा आजीच्या कुशीतच जास्त वाढतो
म्हणूनच…. तो इतरांपेक्षा आजीवर जास्त प्रेम करतो आजीही त्याच्यावर मनापासून प्रेम करते
आजीही त्याला प्रेमाने मायेची ऊब देत राहते
त्यामुळेच… टिकून आहे
पुरातन संस्कृतीची चाल
याचा वाटतो मनोमनी आनंद
प्रा. केशव मुगुटराव काकडे
सासवड ,पुरंदर,
पुणे
Famous poems about grandchildren

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह