मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत grandparents day poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
grandparents day poem in marathi
काव्यबंध समूह,काव्यलतिका स्पर्धा.
दि. १४/९/२०२३.
विषय-आजीची छकुली
आजी नि छकुली | grandparents day poem in marathi

प्रेमाचा पाऊस,
आधाराची सावली
संस्काराच सुंदर लेणं
आजी मायेची माऊली…१
आजी नि छकुली
नातं गुलाबी गोडी.
गप्पा नि गोष्टी
अवखळ खोडी…२
आजीच्या कुशीत
उबदार वास
घरभर शोधतात
एकमेकींचाच ध्यास…३
आजीचं लक्ष
नातीवर छान
खाण्यापिण्याची चंगळ
बटव्याचा मान…४
आजी घराच पावित्र्य,
छकुली मांगल्याच प्रतीक
सोबत नसतात तेंव्हा,
भेटीसाठी अगतिक….५
छकुली प्रश्नांची बरसात
आजी अनुभवांचा साठा
नातीपुढे सिम सिम खुलतो
भावविभोर तरंगणार्या लाटा…६
आजी ओथंबणारी सर,
खळखळ वाहणारा झरा,
छकुली सुखाची पेटी
आनंदाची बरसात खरी….७
ठेच नातीला लागता
आजीच्या उरी कळ
मिठीत घेवून स्वानुभव देते
लढायचे ,झुंझायचे बळ….८
नात जेव्हा जाते
लग्न होवून सासर घरा
आजीच्या डोळ्यात सुखाच्या
आसवांच्या अमृत थारा….९
आजी पाहते वाट
ओसांडून प्रेम रंगूनी
लाडकी बाहुली येणार
कधी माहेरच्या अंगणी….१०
मंगल राजाराम यादव
शिराळा,
जि.सांगली
grandparents day poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह