विजया गोरे आणि सौ. रोहिणी अमोल पराडकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati quotes विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
गौराई आली घरा | gauri ganpati quotes
काव्यबंध समूह
काव्यलतिका उपक्रम
दि. 07.09. 23.
विषय – गौराई आली घरा.

सोनपावली गौराई आली
आनंदाचा घेऊन वसा
तीन दिवसांची जरी पाहुणी
प्रेमाचा वाटा देऊ जरासा
सोन्या रुप्यांने गौरी सजली
ज्येष्ठा कनिष्ठा अशी ही जोडी
रेशमी वस्त्रे लेऊन उभी
प्रेमाने सासर-माहेर जोडी
भाजी-भाकरी नैवेद्य मोठा
फराळाचाही करूया थाट
फळाफुलांची आरास छान
गौराईसाठी घातला घाट
गौरीच्या रूपे लेक ये जणू
मातेचा जीव हो सुपाएवढा
सरबराई तिची किती करावी
मायेचा झरा वाहे केवढा
धूप ,दीप, समई नि वात
सुगंधाचीही किती खैरात
सडा रांगोळ्यांनी फुले अंगण
आनंदाची जणू होई बरसात
निवांत होता जरा माऊली
लेकीची विचारी ख्याली-खुशाली
हितगुज किती चाले दोघींचे
चढते लाली गौरीच्या गाली
गौराई जेव्हा येतसे घरी
घरीदारी वाहे प्रसन्न वारा
कौतुक किती करावे तिचे
संस्कृतीचा हा वारसा न्यारा .
विजया गोरे .
सिव्हिल लाइन्स, नागपूर .
सोन पाऊली | 2 Best gauri ganpati quotes
काव्यबंध समूह
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
स्पर्धेसाठी ……………..
दिनांक:- ७/०९/२०२३
विषय :- गौराई आली घरा
शीर्षक सोन पाऊली
{{{>>>>>>>>>>>>>>>>>>>>}}}

गौराई आली घरा, तिला लिंबलोण करा
रांगोळी सडा दारा, सौभाग्याचा ओसा भरा !! धृ !!
सोन पाऊली आली, मांगल्याचे तेज मुखी
संतुष्ट होत देई , आशीर्वाद रहा सुखी
सजावट फुलांची, शेजारी तांब्याचा करा १
रांगोळी सडा दारा, सौभाग्याचा ओसा भरा !! धृ !!
ज्येष्ठा आणि कनिष्ठा, दोन बहिणींचे रुप
गौरवर्णीय कांती, लावण्यवती स्वरुप
रात्र जागवताना , प्रेमाचा वाहतो झरा २
रांगोळी सडा दारा, सौभाग्याचा ओसा भरा !! धृ !!
आले नवचैतन्य, झाले मन आनंदित
नैवेद्य धूपदीप, दरवळे सुगंधित
भक्तीने उजळल्या, पहा दशदिशा जरा ३
रांगोळी सडा दारा, सौभाग्याचा ओसा भरा !! धृ !!
गणेश सप्तमीसी, भाद्रपदात प्रतिष्ठा
सकळियांची निष्ठा, श्री संगे गौरी धनिष्ठा
गणेशाची आरती, तालसूर ठेका धरा ४
रांगोळी सडा दारा, सौभाग्याचा ओसा भरा !! धृ !!
©<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<®
सौ.रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापुर

gauri ganpati quotes
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
खूप खूप अप्रतिम शब्द रचना… सुरेख 👌👌👌
सुंदर काव्य… खूप छान 👌👌👌
खूपच सुंदर काव्यरचना👌
खूप सुंदर काव्यरचना 👌