ज्ञानदेव लक्षमराव डिघुळे आणि सौ. श्वेता मिलिंद देशपांडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi ukhane for gauri ganpati विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
गौरी पूजन | marathi ukhane for gauri ganpati
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका
विषय~गौराई आली घरा
शीर्षक~ गौरी पूजन

भादव्याच्या सप्तमीला आगमनाची चाहूल ।
आज माहेरी पडत गौराईच ग पाऊल ॥
आल्या आल्या ग गौराई आल्या माहेरवाशीणी ।
चला करूया स्वागत दारी उभ्या सुवासिनी ॥
ताट पूजनाच घ्या ग त्यात लावा निरंजन ।
आधी भरुया ग ओटी मग करूया पूजन ॥
आल्या गौराई घरात त्यांचे लाड ग पुरावा ।
द्या ग हातात भराया त्यांना चुडा ग हिरवा ।
द्या ग नेसायला भारी भरजरी साड्या चोळ्या ।
घाला पायात पैंजण कानी सोनियाच्या बाळ्या ॥
गण गौरीचा बाई आज आहे ग उपास ।
भरा आपुल्या हातांनी त्यांना फराळाचा घास ॥
सोनपाउलांनी आल्या घरा लागले ग पाय ।
त्यांच्या सरबराईची नका करू हयगय ॥
सप्तरंगांच्या रांगोळ्या करा दिव्यांची आरास ।
फुलदाणीत फुलांचा दरवळू द्या सुवास ।।
झाली पूजा नी आरती द्या ग बसायला पाट ।
आणा वाढून जेवाया पंचपक्वान्न ताट ॥
दोन दिसांच माहेर पुन्हा सासरची वाट ।
पुन्हा नाही साल भर एकमेकांशी ग गाठं ॥
गौरा येई माहेराला घर बहरून जाई ।
पुन्हा जाताना सासरी मागे परतुन पाही ॥
ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे .
भालगांव. औरंगाबाद.
आगमन गौराईचे | marathi ukhane for gauri ganpati
📙📘 काव्यबंध समूह📗📕
काव्यलतिका स्पर्धा
_प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा_
दिनांक:- ७/०९/२०२३
विषय :- गौराई आली घरा
कविता पाठवण्याचा दिवस :- ७ सप्टेंबर २०२३
वेळ:- सकाळी ०६ ते रात्री ११.५९ वाजता पर्यंत
स्पर्धेसाठी स्वरचित काव्यरचना
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शीर्षक : आगमन गौराईचे

आली गौराई माहेरी
दिन भाद्रपद मासी
पूर्वा नक्षत्री मुहूर्ती
नव्या वधूपरी भासी ||१||
आगमन गौराईचे
थाट असे स्वागताचा
लगबग साऱ्यांचीच
मिळे मोद अगत्याचा ||२||
सारवावे जमिनीला
करू तिला रुपवान
सजावट आरशीने
सुशोभित करू छान ||३||
करा तयार कोठीला
साडी चोळी नेसवून
रुप येते गौराईला
शृंगाराने सजवून ||४||
करू फराळ नैवेद्य
शेव करंजी चकली
सोळा भाज्या कोशिंबीरी
लाडू पापडी ठेवली ||५||
तिन्ही त्रिकाळ आरती
करतात जल्लोषाने
रात्री असे जागरण
खेळ झिम्मा उत्साहाने ||६||
ओटी भरून गौरीची
केली जाते पाठवणी
जड अंतःकरणाने
मनी जपू आठवणी ||७||
आली गौराई घरा
वातावरण उत्साही
आशीर्वाद देई सर्वां
जाते करून आनंदी ||८||
अशी जेव्हा तीन दिवसांची
येते ही माहेरवाशीण
क्षण सुखाचे देऊन जणू
जाते ही सासुरवाशीण ||९||
©®सौ. श्वेता मिलिंद देशपांडे
जामनगर, गुजरात

गौरी पूजन आणि आगमन गौराईचे | 2 Best marathi ukhane for gauri ganpati
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गौरी पूजन आणि आगमन गौराईचे | 2 Best marathi ukhane for gauri ganpati