gauri ganpati ukhane in marathi

महालक्ष्मी आली तिळा तांदुळाची राशी आणि ती गौराई तीच लक्ष्मी | 2 Best gauri ganpati ukhane in marathi

भारती कुलकर्णी आणि अर्चना कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati ukhane in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

महालक्ष्मी आली तिळा तांदुळाची राशी | gauri ganpati ukhane in marathi

स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी
“काव्यबंध ” समूह
काव्य लतिका
स्पर्धा :
दिनांक : ७.९.२०२३
वार : गुरुवार
विषय : आली आली गौराई माझी
शब्द मर्यादा‌ : १००ते१५० शब्द
+++++++++++++++++++
शीर्षक : महालक्ष्मी आली
तिळा तांदुळाच्या राशी.
काव्य प्रकार : नवाक्षरी

महालक्ष्मी आली तिळा तांदुळाची राशी आणि ती गौराई तीच लक्ष्मी |  2 Best gauri ganpati ukhane in marathi

आली आली गौराई माझी
लक्ष्मी रूपाने पावलांनी
तिळा तांदुळाच्या राशींनी
महालक्ष्मी आली नटूनी….[१]

स्वागतास काढू रांगोळी
पाऊले तुळशी पासून
उंबऱ्यात तांदूळ माप
गौराई येती ओलांडून…..[२]

घरी आली ज्येष्ठ कनिष्ठा
कुंकवाची बोटे लाविली
सुरेखा पैठणी नेसल्या
पंचामृताने पूजा केली….[३]

सर्व दागिने नथ घाली
वेणी फुलांची डोक्यावर
आरास रोषणाई केली
घातले वस्त्र गळा हार….[४]

चिवडा लाडू अनारसा
चकली शेव पाच फळे
दोघींच्या ओट्या ही ठेवल्या
पिण्यासाठी पाणी वेगळे….[५]

गणपतीला भेटायला
गौराई येतात माहेरा
सुख शांती आनंद मिळो
हीच मागणी गौरीहरा…[६]

गौरी येताना शेपू भाजी
भाकरी करू नैवेद्याला
अळूवडी घोसाळी भजी
आपण करू तळणाला…..[७]

पुरणपोळी सोळा भाज्या
कढी कटाची आमटीला
खास करून करतात
सवाष्ण येते जेवायला….[८]

गौरीच्या निरोप दिवशी
वाहूया पिवळे करुनी
सोळा दोरे सोळा गाठींने
फणी करंडे रांगोळीने…[९]

स्वरचित
[C][R]
भारती कुलकर्णी
नौपाडा, ठाणे.(प)
पिन. ४००६०२

ती गौराई तीच लक्ष्मी | gauri ganpati ukhane in marathi

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यस्पर्धा
दिनांक: ०७/०९/२०२३
शीर्षक :- ती गौराई , तीच महालक्ष्मी

ती गौराई तीच लक्ष्मी |  2 Best gauri ganpati ukhane in marathi

कुणी म्हणे गौरी , तीच लक्ष्मी
तीच गौराई अहो ती महालक्ष्मी

नावे वेगळी परी एकच निष्ठा
महालक्ष्मी ही आमची प्रतिष्ठा
एक जेष्ठा आणि एक कनिष्ठा
भाद्रपदी मासी माहेरवाशिणी
तीच गौराई अहो ती महालक्ष्मी..१

श्रावण सरताना लगबग हो झाली
माहेरालाही भेटीची आस लागली
स्वागताची तयारीही सुरू झाली
तीच गौराई अहो ती महालक्ष्मी..२

आवडीस जाणून तयार जाहली
लाडवासवे गं करंजी नी चकली
साडी भरजरी , पायघडी फुलांची
तीच गौराई अहो ती महालक्ष्मी..३

वाजत गाजत बहिणी दोन आल्या
बाळगोपाळांसवे प्रेमभावे भेटल्या
आगमनाला चविष्ट भाजी भाकरी
तीच गौराई अहो ती महालक्ष्मी. ४

मायेची ओटी , पूजा,अभिषेकाचा
पंचपक्वान्न थाट दुसरे दिवसाचा
तृप्त होती, मुखे तेजाळ भगिनींची
तीच गौराई अहो ती महालक्ष्मी..५

नवमीचा तिसराच दिवस परतीचा
मुख कमल हे कोमेजलेले बघवेना
निरोप देताना हुंदका दाटला मनी
तीच गौराई अहो ती महालक्ष्मी..६

अर्चना कुलकर्णी
ठाणे

Best gauri ganpati ukhane in marathi

महालक्ष्मी आली तिळा तांदुळाची राशी आणि ती गौराई तीच लक्ष्मी | 2 Best gauri ganpati ukhane in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

महालक्ष्मी आली तिळा तांदुळाची राशी आणि ती गौराई तीच लक्ष्मी | 2 Best gauri ganpati ukhane in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *