सौ. संघमित्रा सोरटे आणि सौ. बिरादार वर्षाराणी संतोष यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati status in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
लक्ष्मी | gauri ganpati status in marathi
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा.
विषय… गौराई आली घरा.
शीर्षक..लक्ष्मी.

आली,आली गौराई
सजले घर नी अंगण
माहेरवाशीणच्या स्वागताला
सजले ताटात निरांजन
फुलाफुलांच्या पायघड्या
यावे सोन्याच्या पावलांनी
सजविले तुम्हा मखर
नक्षी रेखीली कलाकुसरीनी
घातली रांगोळी ही दारी
सप्तरंग शोभती सुंदर
माहेराशी येई लक्ष्मी
उद्,धूप गंध घरभर
गोड बनवले पक्वान्न
घ्यावा स्वाद भाजीभाकरीचा
दिन उगवे सुवर्णाचा
आशीर्वाद दयावा समृध्दीचा
ज्येष्ठा, कनीष्ठा दोघी बहिणी
सुंदर सुकोमल ते रुप
तेज ओसंडते चेहऱ्यावर
महालक्ष्मीचे साक्षात रुप
सोनीयाच्या पावलांनी येता
वास्तव्य करावे माझ्या घरी
करा आनंदाचे शिंपण
उधळा प्रेमाच्या लहरी
राहो घरावरी तुमची नित्य
अखंड ती कृपादृष्टी
भोळ्या भाबड्या भक्तीने
नका होऊ दुःखी कष्टी
गजानना पाठी यावे
घ्यावा गोड मानून पाहुणचार
ठेऊन अस्तित्वाच्या खुणा
दयावा सुखाला आकार.
✍️
सौ.संघमित्रा सोरटे .
माळशिरस.सोलापूर.
लाडाची गौराई | gauri ganpati status in marathi
🌹🌹काव्यबंध समूह 🌹🌹
🌷🌷काव्य लतिका स्पर्धा 🌷🌷
प्रत्येक गुरुवारी होणारे स्पर्धा
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
दिनांक 7 . 9 . 2023
विषय -गौराई आली
शीर्षक -लाडाची गौराई

सोन्याच्या पावलाने माझ्या
अंगणी गौराई आली
जेष्ठा गौरीच्या
आगमनाची वेळ हो झाली
गौराई आली गौराई आली . . .1
पहाटे पहाटे जाग मला आली
पाखरांची किलबिल कानी आली
श्रावण सरला अन घाई झाली
माहेरच्यांना ओढ तिची लागली
गौराई आली गौराई आली . . .2
उठा आता उठा सकाळ झाली
सोनपावलानी गौराई आली
सजावट केली रंगबिरंगी रांगोळी
काढली
घरात आनंदाची उधळण झाली
गौराई आली गौराई आली . . .3
गौराई आली घराला समृद्धी आली
सारा आसमंत सारी दुनिया व्यापली
सर्व दागदागिने नथ तिला घातली
धान्याची आरास रोषणाई खूप केली
गौराई आली गौराई आली. . .4
गौराईला घातल्या साड्या मखमली
तिच्या स्वागतासाठी झेंडूची फुले फुलली
माहेराला येण्यास खूपच आतुरलेली
मनामनात भक्तीची ज्योत प्रकटली
गौराई आली गौराई आली. . .5
सौ . बिरादार वर्षाराणी संतोष
उदगीर
तालुका -उदगीर
जिल्हा-लातूर

gauri ganpati status in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह