सौ. मोहिनी संजय डंगर आणि सौ. अनिता प्रकाश डोंगरवार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत jivan marathi kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
jivan marathi kavita
काव्यबंद समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
वार : रविवार दि.०१/१०/२०२३
विषय : आयुष्य
आयुष्य एक…प्रवास अनेक | jivan marathi kavita

आयुष्य एक,प्रवास अनेक
तरीही मी न थकता चालतो
कधी आशेच्या हिंदोळ्यावर
मनसोक्त झोके घेतो
कधी दुःखाची वाट तुडवत
फिरत राहतो सुख शोधत
मृगजळासम सुख भासे
बसतो परिस्थितीचा मेळ साधत
आनंदाच्या महामार्गावर
प्रवास सुखकर होतो खरा
हो हो म्हणता आनंद विरतो
पुन्हा निराशेने पडतो चेहरा
माणसांच्या गर्दीत कधी
निस्वार्थी चेहरे शोधतो
स्वार्थी होऊन स्वतःदेखील
आधी हित स्वताचे साधतो
प्रेमाच्या नौकेत स्वार होतो जेव्हा
अवतीभवती गुलाबी रंग भासतो
प्रेमभंग झाल्यावर मग
समुद्रात जीव द्यावासा वाटतो
घेतो आपल्या परक्याचे शोध
स्वताचे मीपण राखून
स्वप्नांची विमाने रोजच भरारी घेती
अपयशाची चव चाखून
आयुष्य आहे चालायचंच
फ़क्त समाधानात जगता यावे
आनंद आहे सुगंधा सारखे
सर्वत्र उधळून पहावे
नात्यांची वीण बांधता यावी
मने सर्वांची जपावी
दुःख लपवत अंतःकरणातले
चेहर्यावर हास्याची लकीर आणावी
सौ.मोहिनी संजय डंगर
रायगड
jivan marathi kavita
काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा
दि.1/10/23 रविवार
विषय- आयुष्य
आयुष्य असे जगावे | jivan marathi kavita

आयुष्याच्या वाटेवरती
सर करावे सुखदुःखाचे डोंगर
कळत नकळत मिळती
आनंदी आनंदाचा सागर ….
जन्म ,कर्म, मृत्यू
आयुष्याची असे त्रीःसुत्री
जीवनी घडवावी सत्कर्म
मरणोपरांत असेल कीर्ती…..
जपावी अनमोल नाती
लाभावे पूर्नःजन्मा साठी
जन्मोजन्मी भेटलो कधी
भासे कधीतरी भेटलो याआधी …..
क्षणाक्षणाला होते कसोटी
तुझीच तू करतो प्रगती
नाही वाटा कुणाचा
लेखाजोखा तुझ्याच कर्माचा…..
जन्मताच प्रवास सर्व नात्यांचा
साथ मिळतो सर्वांचा
पुण्य प्रताप या जन्माचा
आयुष्यअंती प्रवास एकट्याचा….
म्हण असे जगावे दुसऱ्यांसाठी
मी म्हणे जगावे स्वतःसाठी
उत्तम कर्म करावे जगासाठी
लेखा जोखा आयुष्यासाठी …..
उन्हाळा पावसाळा हिवाळा
ऋतू लाभले संसाराला
ठेवते सर्वांना हसत
आयुष्य जगावे असेच……
आयुष्यात असो मुखी
ताटवा शब्द सुमनांचा
अवती भवती मंडरावी
जनरूपी थवा पाखरांचा …..
सौ. अनिता प्रकाश डोंगरवार
मु.पो.जि. गोंदिया

jivan marathi kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह