marathi kavita on life short

गंध आयुष्याचा आणि आयुष्य | 2 Best marathi kavita on life short

सौ. नीता माळी आणि सौ. भारती बागल यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi kavita on life short विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi kavita on life short

काव्यबंध समूह आयोजित रविवारीय काव्यलतिका काव्य स्पर्धा

विषय – आयुष्य

दि -1 -10 – 2023

गंध आयुष्याचा | marathi kavita on life short

गंध आयुष्याचा आणि आयुष्य | 2 Best marathi kavita on life short

फुलांपरी फुलत रहावे
सुगंधापरी दरवळत रहावे ..
आयुष्य माणसाचे
पुष्पलतेपरी बहरत जावे ..

गोड क्षण आयुष्यात ..
लाभतात फार कमी ..
सदा रहावं आनंदाने ..
उद्याची नाहीए हमी ..

उमलणे , बहरणे , कोमेजणे ..
जरी असले क्रमप्राप्त ..
तरी सुकल्या फुलाचाही गंध ..
दरवळतो अंतर्मनात ..

माणसाचे ही असेच असते ..
उत्पत्ती , स्थिती, लय ..
हेच खरे जीवनचक्र तरी..
सुगंधापरी उरावे मागे वलय ..

आयुष्य माणसाचे न सुटणारे गणित ..
किती केला हिशेब तरी चुकतेच काही ..
भूमितीतील काटकोन त्रिकोण ..
भेटती वळणावळणा वरती ..

फुलांचे फुलणे, माणसाचे जगणे
तारेवरची कसरत असे .. ..
ताऊन सुलाखून निघाता यातून ..
आयुष्यास सुवर्णाची झळाळी दिसे ..

अशा आयुष्याच्या एके संध्याकाळी
येता साद त्या दयाघनाची ..
त्या फुलांच्या सुगंधा स्मरूनी ..
अलगद शिरुनी कुशीत त्याच्या ..
घ्यावे आनंदाने डोळे मिटूनी ..

©®सौ.नीता माळी
कोल्हापूर .

marathi kavita on life short

काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा
दिनांक 1/ 10 /2023

आयुष्य | marathi kavita on life short


आयुष्य | 2 Best marathi kavita on life short

खूप सुंदर आहे आयुष्य
त्याकडे सकारात्मकतेने बघावे
माणसाने माणूस मिळवून
हृदया हृदयात घर बांधावे

आयुष्याच्या प्रवासात
आनंदाने चालावे
जग जिंकण्याची ताकद वाणीमध्ये
नम्रतेने बोलावे

स्व कर्माने फुलवावा
आयुष्याचा माळ
पाय ठेवून धरणीवर
यशास ठेंगणे व्हावे आभाळ

भाग्याने लाभतो
नरदेह माणसास
अंतबाह्य पवित्र
नित्य ठेवावे त्यास

आयुष्यात चित्रपटासम लागते
नित्य नवी भूमिका वठवावी
नात्यांची जपण्या वेल
संयमाची पुंजी साठवावी

कधी धरणी कधी आकाशी
आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा झुला
आनंद लुटत उधळत राहावे
घाबरू नये त्याला

देह हे
आत्म्याचे वस्त्र
देखणे बनवते त्याला
सद्विचारांचे शस्त्र

आयुष्याची सारथी
बनते आशा
उत्साह देऊन
दाखवते दिशा

प्रत्येक क्षण शेवटचा समजून
सत्कर्म करावे
उत्कृष्ट कर्तबगारिने
स्व भाग्य लिहावे

आयुष्याची अनमोल शिदोरी
आनंदाने चाखावी
दुनिया दाखवली ज्यांनी
मर्जी त्यांची राखावी

दया क्षमा शांतीचे
व्यसन लावावे आयुष्यास
जग तरसावे
आपल्याला भेटण्यास

कर्म असे करावे
अभिमान सर्वांना वाटावा
जन्मदात्यांचा जन्म ही
सार्थकी लागावा

आरोग्य संपन्न आयुष्य
हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती
देह मंदिराचे आणि चारीत्याचे पावित्र्य
जपणे आपल्याच हाती

कर्माने आपल्या आपण व्हावे
स्व आयुष्याचा शिल्पकार
सकारात्मकतेची जोड देऊन
जीवनीआणावा
आनंदाचा बहार

संथ वाहणाऱ्या निर्झरासम
आयुष्य निर्मळ करावं
सर्वांच्या सोबतीने
सागरा जाऊन मिळावं

बघू ज्या नजरेने
आयुष्य तसे भासते
जीवनाचे सुख सारे
मनातच असते


2 Best marathi kavita on life short

सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

marathi kavita on life short

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *