Marathi Kavita For Life Reality

दोन श्र्वासातील अंतर आणि आयुष्य लिहून बघ | 2 best Marathi Kavita For Life Reality

सौ. संध्या यादवाडकर आणि कोमल मेश्राम यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Kavita For Life Reality विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Marathi Kavita For Life Reality

काव्यबंध समुह आयोजित कविता स्पर्धा
दिनांक: ०१/१०/२०२३
विषय:-आयुष्य

दोन श्वासातील अंतर | Marathi Kavita For Life Reality

दोन श्र्वासातील अंतर आणि आयुष्य लिहून बघ | 2 best Marathi Kavita For Life Reality

दोन श्वासातील अंतर
यालाच म्हणती आयुष्य
क्षणभंगुर आहे ते
आनंदाने जगा आयुष्य…१

भविष्याची काळजी सोडा
भूतकाळ उगाळू नका
आहे सत्य तो वर्तमान
संत वचन विसरू नका…२

लाख योनींच्या फेऱ्यातून
प्राप्त होतो मनुष्यजन्म
आभार माना नियंत्याचे
ऋणात राहून आजन्म….३

सुखसंवाद विश्वासाने
नेहमी साधत राहावे
संशयाला दूर ठेवून
आयुष्यात सौख्य आणावे…४

वाढवत रहावे मनोबल
नित्य करूनी योगासन
आहार विहार संयमी
स्वस्थ राहील तनमन….५

थोरांचा करावा आदर
आदबशीर असावे वर्तन
मनस्वास्थ्य राही उत्तम
आयुष्य होईल संपन्न…६

आयुष्य म्हणजे रांगोळी
नियती ठिपके ठरवी
चपखल रंग भरुनी
आकर्षक सुबक करावी…७

जोडावी नाती मनापासून
निभवावी आयुष्यभर
आनंदी होईल जीवन
गोडी वाढेल कांकणभर…८

विध्यात्यापुढे जोडावे कर
कृतज्ञ सदैव रहावे
सामाजिक बांधिलकी जपत
आयुष्य भरभरून जगावे…९

(शब्दसंख्या -१०८)

सौ.संध्या यादवाडकर.
ठाणे (पश्चिम).
9819993137

Marathi Kavita For Life Reality

काव्यबंध समुह आयोजित कविता स्पर्धा
दिनांक: ०१/१०/२०२३
विषय:-आयुष्य

आयुष्य लिहून बघ | Marathi Kavita For Life Reality

आयुष्य लिहून बघ | 2 best Marathi Kavita For Life Reality

काय आहे हो हे आयुष्य अजूनही कळालं नाही
बालपणीही बालपण सुखात मिळालं नाही

आयुष्य हे आनंदाने जगाव की ,
आयुष्यभर झुरून झुरून मराव
आपल्यांना परक म्हणावं की ,
परक्यांना आपलं म्हणावं

आयुष्यात आयुष्यभर काय करावं कळलच नाही
ज्याच्या भरवश्यावर आयुष्य होतं
तो बाप हिरावून गेला तेव्हापासून
आयुष्यात कोणी बापासारखा मिळाल नाही

या आयुष्याची ठेवण
अजूनही उमगली नाही
वाढत्या फुलाची कळी तुटली
तेव्हापासून ते फुलही कधी फुलच नाही

सर्वांच भलं होवो
मनी हाच ध्यास असतो
का रे माणसा तू
माझ्या परिस्थितीवर हसतो

आयुष्याच्या खडतर प्रवासाने
खूप काही शिकविले
काय कुणास किती सांगावे म्हणून
या मनाने मनातच लपविले

हातावरच्या रेषा बघून
म्हणे आयुष्य जगावे
ज्याला हातच नाही
त्यानी काय मरून जावे

तुला सोपं वाटणार हे आयुष्य
माझ्या परिस्थितीने जगून बघ
लिहिता लिहिता डोळ्यात पाणी नाही आलं
तर आयुष्यावर तू पुन्हा लिहून बघ

कोमल मेश्राम

2 best Marathi Kavita For Life Reality

Marathi Kavita For Life Reality

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *