रमेश अनंत चव्हाण आणि सौ. शारदा मालपाणी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri poem in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
navratri poem in marathi
” काव्य बंध समूह”आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार.
काव्यलतिका….स्पर्धा.
दि.०८/१०/२०२३
विषय…नवरात्री.
दुर्गा मातेची नऊ रूपे | navratri poem in marathi

प्रथम रूप देवीचे शैलपुत्री
कन्या पर्वतराजा हिमालयाची
हाती त्रिशूल आणि कमल फुल
पूर्व जन्मात होती कन्या दक्षराजाची!!१!!
दुर्गेचे दुसरे रूप ब्राम्हचारिणी
निर्जळी स्थानी केले तपाचरण
अन्न-पाण्याचाही करून त्याग
केले घोर तपाचे आचरण!!२!!
दुर्गा देवीचे तिसरे स्वरुप चंद्रघंटा
ललाटावर करुनी चंद्र धारण
भूतलावर करण्या अंधकार दूर
अवतरली धर्माचे करण्या रक्षण!!३!!
दुर्गा देवीचं चौथे रूप कुष्मांडा
स्मित हास्याने ब्रह्मांडाचे उत्पन्न करुन
भक्तांची सर्व संकटे करून दूर
दीर्घायुष्य आणि बुद्धी केली प्रदान!!४!!
दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता
कमळाच्या आसनावर विराजमान
संबोधतो तिला पद्मासना देवी
देवीचे सिंह आहे वाहन!!५!!
दुर्गेचे सहावे रुप म्हणजे कात्यायनी
कात्यायन ऋषींनी भगवतीची तपस्या कठोर
घेतला त्यांच्या घरी कन्या जन्म देवीने
चार भुजधारी हाती धारण तलवार!!६!!
दुर्गामातेचे सातवे रूप कालरात्रि
सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी मानतात
चार भुजाधारी शुभंकारी देवी
लोखंडी कोयता कट्यार हातात!!७!!
दुर्गामातेचे आठवे रूप महागौरी
शंकरप्राप्ती साठी केले तप आचरण
राक्षस दैत्य चा वध करण्यासाठी
महागौरीने कौशिकी स्वरुप केले धारण!!८!!
माता दुर्गाचे नववे रूप सिद्धिदात्री
कमळाच्या फुलात विराजमान
चार भुजाधारी हाती चक्र गदा धारण
सिद्धीदात्री देवी आहे सिद्धिप्रदान!!९!!
रमेश अनंत चव्हाण
तोंडली मंडणगड
navratri poem in marathi
काव्यबंध साहित्य समूह आयोजित रविवार काव्य लतिका स्पर्धेसाठी रचना..
दिनांक..8/9/2023
दुर्गादेवीची नऊ रुपे | navratri poem in marathi

आश्विनमासी शारदीय नवरात्री
हिमनगजा शैलपुत्री पार्वती येई
वृषभारुढ शिवशक्ती जगदंबा ही
नऊ दिवस शक्तीचे वरदान देई. ! 1!
ब्रम्हाजीची शक्ती ब्रम्हचारिणी
हातात कमडंलू अन जपमाळ
हरित रंग पैठणीचा सृजनाचा
माते षडरिपुंचे कुविचार टाळ.! 2!
तृतीयेला येई चंद्रघंटा देवी घरी
मणीपूर चक्राची ती निवासीनी
भक्तीभावाने करु पूजा आराधना
तुज समान तेज देई महिषासूरमर्दिनी.! 3!
कुष्मांडा देवीने व्यापले हे ब्रम्हांड
सूर्याचे तेजोमय महाकाली स्वरूप
असुरांवर तुटून पडली कपालिनी
सिंहवाहिनी भद्रकाली घेवून रूप .! 4!
स्कंदमाता षडाननाची ही आई
विशुद्ध चक्राची देवी निवासीनी
सिंहारुढ कमलिनी करी शोभे
देवी चंडमूड धुम्रवर्ण विनाशीनी.! 5!
सिंहारुढ कात्यायनी देवी चतुर्भुजा
कमल पुष्प अन तलवार घेऊनी करी
अलौकिक तेजःपूंज मुद्रा मातेची
तुटून पडली सौदामिनी असूंरावरी.! 6!
महागौरी सहस्त्रारचक्र निवासीनी
वृषभारुढ हाती त्रिशूल डमरुधारी
गौरांगी श्वेत परिधान तेजस्वी मुख
कुबुध्दी नाशिनी असूर विनाशकारी.! 7!
कालरात्री देवीचे विकराल रुप
तमसनाशिनी व्याघ्रचर्म धारिणी
गर्दभवाहिनी परशू खडग हाती
चतुर्भूजा देवी विपत्तीहारिणी.! 8!
नवम रुप सिद्धीदात्री देवी सोज्वळ
पुरवीते तू भक्तांचे सर्व मनोरथ
होम हवन सप्तशतीचे पाठ पठन
सुकर होऊ दे माते हा जीवन पथ.! 9!
नऊ दिवस नऊ रूपाची उपासना करु
धूपदीप नैवेद्य आरती फुंकू या घागर
खण नारळाची आईची ओटी भरुन
स्त्री शक्तीच्या सन्मानाचा करू जागर.!१०!
🖋️🌹 सौ. शारदा मालपाणी
(काव्य सम्राज्ञी) अमरावती
सर्व अधिकार सुरक्षित ©️®️
navratri poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह