महारथी कर्ण | best poem on maharathi karn in 2024

राजेश साबळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on maharathi karn in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

poem on maharathi karn in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका
रविवारीय स्पर्धा..
दि. ३ .३. २०२४
विषय:- महारथी कर्

महारथी कर्ण | poem on maharathi karn in 2024

जाहला चमत्कार येथे तेंव्हा,
घडले आघडीत हे मात्र!
सूर्य तेजाने प्रकाशमान जाहले,
भू मंडळ वातावरण सर्वत्र!!

पारखून पहावा खरा की खोटा,
ऋषी व्यासांचा मंत्र!
म्हणून कुंतीने आळविला गुरु,
ऋषींचा सुर्यपुत्र मंत्र!!

लग्न आधी पुत्र जन्माला,
महाराणी कुंती पोटी सुर्यपुत्र!
नाव गाजले महारथी म्हणून,
कुंती पुत्राचेच सर्वत्र!!

कोणी म्हणाले सुत पुत्र हा,
पोर नावाड्याचा मात्र!
नदीपत्रामधी टोपलीत सापडला,
एक दिव्यतेज पुत्र!!

लग्ना आधीचे जार कर्म म्हणून,
घाबरली कुंती मात्र!
विचार केला मनात तीने आणि,
शोधली युक्ती मात्र!!

टोपलीत घातले बाळ तीने,
दिले सोडून नदीत मात्र!
तेच हे बाळ नदीपात्री मिळाले,
नावाड्यास एक मात्र!!

हाच पांडव राज पुत्र वाढला,
नावाड्या घरी मात्र!
सुत पुत्र म्हणून नाकारले त्यास,
धनुर्विद्या शिक्षण सर्वत्र!!

खोटे सांगून त्याने मिळविले,
धनुर्धारी शिक्षण मात्र!
पारंगत झाला महावीर तोच,
धनुर्धर कुंतीपुत्र!!

शत्रूचा शत्रू हा मित्र आपुला,
हेच असे खरे सूत्र!
धनुर्धर कर्णाचे नाव ऐकुनी,
कौरव खुश झाले मात्र!!

या सूत्राचा आधार घेवून तो,
दुर्योधनास मिळाला मात्र!
जाहला दुर्योधनाचा मित्र तोच,
महारथी कर्ण एक मात्र!!

त्यात घडले द्रौपदीचे चिरहरण,
हे दुसरे कारण एक मात्र!!
तिथेच होते महारथी कर्ण तरी,
ना थांबविले हे दृष्ट सत्र!!

जाहले महाभारत मोठे अन,
लढण्या निवडले कुरुक्षेत्र!
जाहले जगावेगळे महायुद्ध,
अहाकार मजला सर्वत्र!!

भगवान श्रीकृष्ण होते सारथी,
तरी पेटले रणांगण मात्र!
त्या धारातिर्थी पडले महारथी,
गुरु शिष्य दोन्ही एकत्र!!

माय भगिनी किती जाहल्या विधवा,
आणि आक्रोश सर्वत्र!
यादव कुळ नाशाला कारण आहे,
महारथी कर्ण एक सुतपुत्र!!
………………………………………….
रचना – राजेश साबळे,ओतूरकर
उल्हासनगर (ठाणे) मो.९००४६७४२६३

poem on maharathi karn in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *