Shiv Jayanti Information in Marathi

शिवजयंती मराठी माणसाचा सण | Great Shiv Jayanti Information in Marathi 2023

Shiv Jayanti Information in Marathi जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी? का करतात त्यांची जयंती साजरी? काय आहे या मागचा उद्देश?

Shiv Jayanti Information in Marathi

शिवजयंती मराठी माणसाचा सण | Great Shiv Jayanti Information in Marathi 2023

छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करणारे पहिलेच राजे म्हणावे. शिवाजी महाराज एक थोर महापुरुष होते. त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार हे नुसतेच त्यांच्या कामी आले नाहीत, तर प्रगत राष्ट्र, स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांची मदत झाली. आपली स्वराज्य स्थापना तसेच राज्यकारभार यातून सर्व जागाला एक प्रकारे बोध देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. समानता आणि एकजूटता या मुल्यांच पालन छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच करत होते.

स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा अभिमान आहे. इतकचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही महाराष्ट्रातील कधीही न विसरला जाणारा सण व उत्सव आहे .भारत सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सर्व मुलांना सार्वजनिक सुट्टी असते .महाराष्ट्राबाहेर काही ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Shiv Jayanti History in Marathi | शिवजयंती इतिहास

महात्मा फुले यांनी 1869 साली रायगड येथील, शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. इतकच नाही तर त्यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला होता. शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिणारे त्या काळातील ते पहिलेच व्यक्ती होते. ज्योतिबांनी त्याकाळी सरकारला एक अर्ज केला .त्यामध्ये अस लिहिलं होतं की, रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था करावी.

1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी ही जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला. हे जयंती करण्या मागचा हेतू म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रप्रेम जागृत कराव हा होता. फक्त महाराष्ट्रातच नाही तर बंगालमध्ये देखील शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला सुरुवात झाली होती.

1869 ते 1912 या काळामध्ये शिवजयंतीची सुरुवात बंगालमध्ये सखाराम गणेश देऊस्कर यांनी केली होती. सखाराम गणेश देऊस्कर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. सखाराम गणेश देऊस्कर हे महाराष्ट्रातील होते परंतु ते बंगालमध्ये स्थायिक झाले होते.

रवींद्रनाथ टागोर हे उत्तम कवी होतेच, त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक सुंदर कविता लिहून शिवाजी महाराजांबद्दल सर्व जगाला त्यांच्या कवितेद्वारे शिवाजी कोण आहे ?आणि त्यांचे पराक्रम काय? हे समजावून सांगितले. रवींद्रनाथ टागोर हे त्यांच्या कवितेद्वारे म्हणतात की, हे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या मनात जेव्हा स्वतंत्रतेचा विचारला रुजला होता, तेव्हा माझी बंगभूमी मुकी राहिली होती. पण मात्र तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्यकरितेचा सन्मानाचा मंत्र हा इथून पुढे नेहमी आमच्या सर्वांच्या मनात तेवत राहणार.

लोकमान्य टिळकांना शिवजयंतीचे खूप मोठे श्रेय दिले जाते. कारण त्यांच्या नंतरच शिवाजी महाराजांची जयंती इंग्रजांच्या विरोधात जाऊन सर्व तरुण एकत्र येऊन सन्मानांचं आयुष्य जगण्यासाठी आणि स्वतंत्र मिळवण्यासाठी एकजूट होऊन लढत होते. आणि आपल्या राष्ट्राबद्दल जिज्ञासा जागृत होऊन
तरुण राष्ट्रविचारी होईल या उद्देशाने ही जयंती साजरी करण्यात येत होती.

महाराजांच्या जन्मदिवसावर मते

Shiv Jayanti Information in Marathi 2023

महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती साजरी करतात आणि या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे ,पण इतर तारखेंमध्ये बघितल तर ६ एप्रिल १६२७ हा शिवाजी महाराजांचा जन्मदिन मानला जातो. इतकच नाही तर काही लोक पंचांगानुसार शिवाजी महाराजांचा जन्मदिन साजरा करतात फाल्गुन वद्य तृतीय हा दिवस ते महत्वाचा मानतात.

शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्या मागचा उद्देश म्हणजे, शिवाजी महाराजांचे विचार ,तरुणांमध्ये निर्माण झालेली एकजूटता, राष्ट्रप्रेम ,आणि त्यांच्या थोर विचारांचा समर्पण करणे होय. महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले स्वप्न आणि इंग्रजांचा पराभव करण्यासाठी या थोर महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केले.

शिवजयंती मराठी माणसाचा सण | Shiv Jayanti Information in Marathi 2023

इतर साहित्य वाचा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कविता

छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

9 thoughts on “शिवजयंती मराठी माणसाचा सण | Great Shiv Jayanti Information in Marathi 2023”

  1. Pingback: लोकमान्य टिळक माहिती 2023 | Free Balgangadhar Tilak Information In Marathi

  2. Pingback: साने गुरुजी माहिती 1000 शब्दांमध्ये | Best Sane Guruji Information In Marathi

  3. Pingback: पंडित नेहरू मराठी माहिती | Best Jawaharlal Nehru Marathi Mahiti 2023

  4. Pingback: सूर्याचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best Sun Autobiography In Marathi 2023

  5. Pingback: दुःखी नदीचे आत्मवृत्त मराठी भाषेत | Best River Autobiography In Marathi 2023

  6. Pingback: सैनिकाचे आत्मवृत्त 1000 शब्द | Best Soldier Autobiography in Marathi

  7. Pingback: व्याकुऴलेल्या व्यथा.. | Best Sad Story in Marathi 2023

  8. Pingback: का पार्वती मातेने दिला बैलाला श्राप ? Best Bailpola Information in Marathi 2023

  9. Pingback: बैल पोळा निबंध मराठी | Best Bail Pola Nibandh in Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
11 × 5 =