त्याच त्या रटाळ पद्धतीने प्रपोज केला तर नकार येईल याची भीती वाटते? काळजी करू नका Best Marathi Propose Kavita मध्ये तुम्हाला युनिक प्रपोज कविता मिळतील.
Best Marathi Propose Kavita

मनाच्या घट्ट गाठींनी आपली तयार झाली जोडी,
जीवनाच्या वाटेतील सुखदुखांशी होतील अनंत भेटी…
तुला सांगायचे आहे मनात व्याकूळता आहे थोडी,
सोबत सात जन्म जगायचं आहे होशील का जीवनसाथी ?
प्रेमाच्या सागरातील, तू भरती आहेस.
तहानलेला चातक मी, तू पाऊस आहेस.
माझ्या प्रेमाला तू आकर्षण समजू नकोस,
या प्रेमाचा स्वीकार करशील अशी मला अशा आहे.
प्रत्येक क्षणाक्षणाला, मी तुझा विचार करतो,
आज माझ्या पवित्र प्रेमाची मी कबुली देतो.
चल आयुष्याच्या यात्रेत सोबत येशील का?
लग्नाचे सात फेरे तू माझ्यासोबतच घेशील का ?
माझ्या आयुष्याच्या चित्रपटातील, संगीत तूच आहेस.
माझ्या हृदयाचे ऐक, प्रत्येक ठोक्यामध्ये तू आहेस.
गुंतले आहे माझे आयुष्य, तुझ्यामुळे असेल आयुष्यात हसणे.
नकार देऊ नकोस प्रिये, नाहीतर अशक्य होईल हे जगणे.
एकदा तू हो म्हण, तुला दुसर्या कोणत्याही प्रेमाची गरज पडणार नाही.
सगळी सुखे दाराशी आणील, तुला कशाचीच स्वप्ने बघावी लागणार नाही.
माझे प्रेम एकदा पारखून तर बघशील प्रिये,
मला हो म्हटल्यानंतर, दुःख तुझ्या कडे पाहणार सुद्धा नाही.
Best Marathi Propose Kavita
Romantic Poem on Love in Marathi

प्रेमाच्या माधुर्यामध्ये, तूला कशाचीच उणीव भासणार नाही.
माझे खरे प्रेम, तुला हो म्हटल्याशिवाय जाऊ देणार नाही.
कुठलीही परीक्षा द्यायला मी तयार आहे साजणी,
तू फक्त म्हण, जीव द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही.
तुझ्याबरोबर मला, एक उज्ज्वल भविष्य दिसत आहे,
आज मला ते, तुलाही समजावून सांगायचे आहे.
माझ्या मनाची इच्छा, तुझ्यासोबत जगणे हीच आहे,
पण तुला समजल्याशिवाय, एक पाऊलही पुढे नाही जायचे आहे?
तुझे स्मित माझ्या दिवसातील सूर्यप्रकाश,
तुझे आसू माझ्या नजरेला काळाकुट्ट अंधार…
माझी कधी होशील, हाच मनात प्रश्न गंभीर,
तळमळत असतो तुझ्या प्रेमासाठी झालोय अधीर…
तुझ्या प्रत्येक अदा आठवणीत टिपताना,
थकत नव्हत्या कित्त्येक नजरा तुझी तारीफ करताना.
पण वासनेचा स्पर्श सुद्धा नव्हता माझ्या नजरेच्या बाणांना
माझ्यासारखे कुणी भेटणार नाही तुला खरे प्रेम करताना.
आज मी माझ्या भावना अभिमानाने सांगत आहे.
प्रेम एक प्रवास आहे आणि तू माझा मार्गदर्शक आहेस,
तू पण माझ्याबरोबर या वाटेवर चालशील का?
तुझ्याबरोबर, मला एक नवीन जग दिसत आहे.
Best Marathi Propose Kavita