मुकी होत चाललेली घरे | Best Marathi Essay On Ghar 2023

मुकी होत चाललेली घरे | Best Marathi Essay On Ghar 2023




🏠🏡🏠🏡🏠🏠 *घराला घरपण देणारी माणसे* !! कित्ती सुंदर वाटते ना हे वाक्य !! आणि का नाही वाटणार ? कारण शिडाचे घर असो वा काचेचा बंगला …हा स्वप्नांनी सजलेलेला असतो. वाचा Marathi Essay On Ghar

प्रत्येकास आपली कुटी ( घर) ही प्रिय असते. त्याच घरात सुख दुःखाची नाळ जोडलेली असते .. किती सुंदर आहे ना हे सर्व…
पूर्वीच्या काळी वासुदेवाची स्वारी आली की घरातील स्त्री सूप भरून धान्य घेवून यायची व वासुदेवाची झोळी भरायची …..गुरा वासरांना चारा घालून , सडा मार्जन करून दैनंदिन कामात मग्न व्हायची ..कामाची धांदल चालता चालता त्यातूनही गप्पा टप्पा, मुलांना उपदेश, हास्य विनोद यातून त्यांना दिवस कधी उगवतो व कधी मावळतो याच भान नसायचं …..आगदी गोकुळासारख घर ….

मुकी होत चाललेली घरे | Essay On Ghar

Marathi Essay On Ghar 2023


कधी कधी असे वाटायचं की या घरातील भिंती ही एकमेकांशी बोलतात की काय ….इतकं हसरे घर असायचं …उने दूने नव्हते असा भाग नाही पण माया , प्रेम , आपुलकी इतकी होती की चेहऱ्यावरील हास्यात सुख आहे की दुःख आहे हे लगेच ओळखता यायचं …माहेरची सर नणंद,जावा भरून काढायच्या…
गूरा वासरानी भरलेला गोठा, चौथरीवर लागलेले धान्याची पोती , पणजी पासून परतवंडे असणारी माणसे हे त्या घराचं वैभव होते .घरातील एखादे भांडण विकोपाला जरी गेले तरी चार भिंती बाहेर कधीच गेले नाही . ही आपली मराठी संस्कृती …

Marathi Essay On Ghar.

काळ गेला वेळ गेली ….शिक्षणाची कास धरली .प्रत्येकजण प्रगतीच्या मार्गी धावू लागला . कुडाच्या भिंतीची जागा आता पत्र्याने घेतली अन् काचेच्या बंगल्यात सोन्याची कमोड आली …पण माणूस हा माणूसच आहे . किती ही पश्चिमात्य संस्कृतीची ओढ जरी लागली… तरी घरातील आजीची नऊवारी घराण्याची शान आहे . पारावर बसलेली वयस्कर माणसे अनुभवांनी शकलेल्या जिवणपटाचे चालते बोलते विद्यापीठ आहे.
आता मुले शिकून मोठी झाली गाव , शहर,प्रांत,देश सोडून परदेशी झाली . तिथली संस्कृती आणि राहणीमान आता खेडी पाडी ही सरमिसळून गेले आहे .आता कॉपी राईट चा जमाना आला . यात कोणाचाच दोष नाही कारण जगाच्या गतीने जाणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.

Marathi Essay On Ghar.

मुकी होत चाललेली घरे | Best Marathi Essay On Ghar 2023


मुले शकली त्यांनी प्रगती केली याचा घरच्यांना सार्थ अभिमान आहे .पण …सध्या प्रकर्षाने जाणवते की नाती आहेत ,भावना आहेत ,पैसा आहे पण बोलण्यासाठी कोणाकडे वेळ नाही …. मुलांशी संभाषण नाही , चार अनुभवाचे बोल नाहीत , वढील धाऱ्यांची काळजी ना विचारपूस ….केअर टेकर ठेवली म्हणून आई बाबा ची काळजी केली ,सेवा केली असे नसते …..तुमचे प्रेमाचे शब्द संजीवनी आहेत आई वडिलांसाठी ..
आता राहणीमानाबरोबरच खूप आधुनिक सुविधा आल्या …कोसो दूर असणाऱ्या माणसांशी पत्राने बोलले जायचे व खुशाली कळायची आता मोबाईल चे एक बटन दाबले की दूरवर असणाऱ्या माणसाशी जवळ बसून बोलल्याचा भास होतो… इंटरनेट च्या माध्यमातून ऑनलाईन परदेशी असणाऱ्या आपल्या माणसाशी बोलता येते…किती प्रगती केली माणसाने …..

Marathi Essay On Ghar.

_____________________________

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

शिक्षकांसाठी मराठी शायरी | Best Teacher Shayari In Marathi 2023

वाचा युनिक वाढदिवसाच्या शायरी Marathi Birthday Wishes

वाचा आयुष्यावर प्रेरनादायी विचार Read Quotes on life

_____________________________


आता व्हॉटसअप , इंस्टा,फेसबुक च्या माध्यमातून दूरची पण जवळ आलेत …. तासन् तास होणाऱ्या गप्पा जेवणाचे ही भान ठेवत नाही . भाजीत वरण आहे की वरणात भाजी आहे हे सुद्धा आता कळेनासे झालं आहे .
प्रत्येकाकडे मोबाईल आहे छान आहे पण …..आई कडून चहा हवा असेल तरी मसेज करून सांगणार …ही कसली संस्कृती …
दिवस रात्र त्या स्क्रीन च्या सानिध्यात …बोटे फिरली की मनातील भावना व्यक्त….आरे… पण तुम्ही तोंडाने कधी घडा घड बोलणार ….कधी मन मोळके हसणार , अनुभवाचे धडे वढीलधाऱ्या कडून कधी घेणार . मेसेज केला की झालं …आई वडील च असे वागतात तर .. मुले काय वेगळे वागणार आहेत . जेवणाच्या टेबलवर मोबाईल सोडत नाहीत मग ही काय एकमेकांची विचारपूस करणार .

Marathi Essay On Ghar.


अशा मुक भावना मांडता मांडता माणसे मुक झाली आहेत,अन् माणसं मुक झाल्यामुळे आता घरे ही मुकी होत चालली आहेत…काय अश्या या आधुनिक संस्कृतीचा उपयोग , अधीन झाला आहेत लोक आधुनिकतेच्या नावाखाली .. मानवा नेच बनवलेल्या यंत्राच्या अधिपत्याखाली ….


सजवले घर लाख लाख रुपयांच्या झुंबरानी पण त्या घरात मायेची ,आपुलकीची पणती कधीच तेवली नाही . का ? कधीच वाटत नाही की एकमेकांशी मनमोकळे बोलावं , वाटते!!!! …..पण वेळेअभावी बोलता येत नाही अशी कारणे पुढे येतात …पण …तुम्ही मेसेज करताना जो वेळ देता तोच वेळ प्रत्यक्ष भेटून बोलून ध्या ना … काय अवघड आहे का त्यात ….वेळी अवेळी घरी येणे , घरी आले की कंटाळून झोपणे ,सकाळी परत धावत्या ट्रेन सारखं पळणे ,त्यातून काही आठवलेच तर मसेज करणे . का मुके झालात असे ? पैसा प्रिय झाला की , माणसे नको झालीत ?

Marathi Essay On Ghar.


अहोरात्र कष्ट करून इमला बांधला , सुख सोई चा डोलारा उभा राहिला . पैशाने बलाढ्य झाला माणूस पण मुखाने कंगाल झाला …
*खंत वाटते या गोष्टीची ….मुकी होत चालली घरे….🏠*

सौ. संध्या देशपांडे


11/A,Street 23 ,Sector one, भिलाई छत्तीसगढ,
जिल्हा दुर्ग

Mob 9424106069

1 thought on “मुकी होत चाललेली घरे | Best Marathi Essay On Ghar 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *